या दोन चित्रांत नदीकाठचा माणेचा थर आणि माणगंगेचा प्रवाह दाखवला आहे.
माण मातीचे वैशिठ्य =
माणदेशाच्या भूमीचे वैशिठ्य म्हणजे इथली माती. ही माती माण माती या नावानेच प्रसिद्ध आहे. माणदेशातील सर्व ओढे किंवा माणगंगा नदी ही वर्षातून १० ते ११ महिने कोरडीच असते. परंतू नदीकाठच्या किंवा ओढ्या काठच्या ५०० फुटाहून अधिक भागातील विहिरींना उन्हाळ्यात सुद्धा पाणी असते. हे या माण मातीचे वैशिठ्य म्हणावे लागेल. या भागातील विहिरी सरासरी ६५ ते ७५ फूट खोल आहेत. या विहिरींत प्रथम २ ते १० फूट खोल करलाची माती चोपण किंवा क्षार माती लागते. त्याखाली मऊ माण ५ ते १५ फूट आणि ताच्याही खाली १० ते २० फूट कठीण माण आणि नंतर अगदी खाली गेले तर चूनखड लागते. ही चूनखड अत्यंत कठीण असते, ती पहारेने अगर सुरुंगानेच फोडावी लागते. त्याखाली काळी रेती, जळक्या राखेसारखी राळ २ ते ८ फूट लागते. त्या खाली खडक लागतो. या खडकात मात्र पाणी नसते. या भागात खडकात पाणी नसते तर माण मध्ये पाणी हमखास असते. हे ही वैशिठ्यच म्हणायचे.
तुमच्या ब्लॉगवरील लेख वाचला. तुमच्याशी बोलण्याची इच्छा आहे. तुमचा मोबाईल क्रमांक पुरवू शकाल का? माझा क्रमांक 9029557767.
ReplyDeleteकळावे.
किरण क्षीरसागर
Pls Contact me On my mobile no. 8805008957
Delete