Tuesday 24 July 2012

माणदेशाची गंगा - माणगंगा नदी.

माणगंगा नदीच्या उगमस्थानी असलेल्या सीता मंदिरातील सीतामातेची मूर्ती -
भगीरथाच्या अथक प्रयत्नाने स्वर्गातली गंगा भूलोकी अवतरली असे मानण्यात येते. त्या प्रमाणेच माणगंगा नदी बाबतही एक आख्यायिका सांगतात. रामायण काळात जेंव्हा राम आपल्या सीतेसह लक्ष्मणाला घेऊन शंभू महादेवाच्या डोंगरावर आले. त्यावेळी सीतेला तहान लागली म्हणून लक्ष्मण पाणी आणण्यासाठी डोंगरा खाली कुठे पाणी मिळते का ते पाहण्यासाठी गेला. तोपर्यंत त्या जागीच रामाने एक बाण जमिनीवर मारला आणि त्या ठिकाणातून पाण्याची धार वर आली. परंतू  तो वर सीतामैयेला ग्लानी आली. ती तिथेच झोपी गेली. हे पाहून रामाने एका द्रोणात ते वाहू लागलेले पाणी भरले आणि सीतेला दिसेल असे तिच्या डोक्यालगत ठेवले आणि तो ही लक्ष्मणाच्या शोधात निघून गेला. इकडे सीता मैया जागी झाली अन अचानक तिच्या मानेचा धक्का त्या द्रोणाला लागला आणि द्रोण रिता झाला. सगळे पाणी सांडले, हे सांडलेले पाणी आजही अखंड एका प्रवाहाप्रमाणे वाहत आहे. हे वाहते पाणी म्हणजेच आपली माणगंगा नदी. सीता मातेच्या मानेच्या धक्क्यामुळे हे पाणी वाहिले म्हणून  तिला माणगंगा असे नाव पडले.ही नदी आपल्या माणदेशाची गंगाच आहे.

No comments:

Post a Comment