Saturday, June 30, 2012
नद्यांचे रक्षण, संवर्धन करणे हाच राजाचा धर्म आहे
हे राजन लक्षात ठेव या सृष्टीचा उदय नद्यांपासून होतो. नद्यांसारखे कल्याणकारी दुसरे कुणीही नाही. तेंव्हा सगळ्या नद्यांचे रक्षण, संवर्धन करणे हाच राजाचा धर्म आहे असा उपदेश आपल्या हिंदुस्थानच्या पौराणिक काळातल्या महाभारताच्या शांतीपर्वात गुरु भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला केला होता. अगदी महाभारत कालापासून नद्यांचे महत्व विषद केले असले तरी आजही आपण आपल्या प्रदेशातल्या नद्यांबाबत काळजी घेत नाही. राज्यकर्तेही केवळ सत्तेची खुर्ची उबविण्यापलीकडे नद्यांसारख्या विषयाकडे गंभीरपणे पाहत नाहीत. त्यामुळेच आज काही अपवाद वगळता, देशभर पाण्याची ओरड सुरु आहे. पावसाअभावी आपले सगळे जीवनचक्र ठप्प होताना दिसते. वास्तविक पाऊस यायचा तेंव्हाच येतो आणि पडायचा तेवढाच पडतो..पण आपण त्याच्याविना अधुरे आहोत. तरीही काही गोष्टी आपल्याच हातात आहेत. पाणी हे जर जीवन आहे तर, त्या जीवनाचा नाशाला आपणच कारणीभूत आहोत.
बारमाही माणगंगा हा एक पर्याय आहे मृतावस्थेतील नद्या परत जिवंत करण्याचा.......चला या पर्यायाचा अवलंब करू या. कसे ते प्रत्यक्षच पहा. त्यासाठी फक्त इथे क्लिक करा.
http://www.barmahimanganga.blogspot.in/
No comments:
Post a Comment